Lyrics of Trigunatmak Traymurti from album Ganapati Aarti

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधिले ध्याना ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय श्रीसद्गुरुदत्ता ।
आरती ओवाळीतां हरसि भवचिता ॥
सबाह्यअभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैसी न कळे ही माता ।।
पराही परतली कैचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरला असे अंत ॥ २ ॥ जय देव...
दत्त येऊनीया उभा ठाकला ।
सद्भाव साष्टांग प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ जय देव...
दत्त दत्त ऐसे लागलें ध्यान ।
हरपलें मन झालें उन्मन ।
मी तू पणाची झाली ओसण ।
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥ जय देव...