Lyrics of Timiratuni from album Bol Bol Vaache

2. तिमिरातूनी पसरुनिया बाहू
राधे कृष्ण, गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, गोपाल कृष्ण
तिमिरातूनी पसरुनिया बाहू,
आले ते उजळीत
भक्तिरसांनी प्रगटित होऊनि
येती अनिरुद्धऽऽऽ, आमचे आमचे अनिरुद्ध ॥धृ॥
जा प्राणांनो श्वासासंगे
जीव धरुनी अनंग।
जा वृत्तींनो नामासंगे
रूप धरूनी श्रीरंग।
त्या अनिरुद्धा सांगा
माझ्या हृदयीचे नवरंग।
पुन्हा पुन्हा अवघ्राण
करावा तुझ्या कृपेचा गंध
आमचे आमचे अनिरुद्ध ॥१॥
जा स्वरांनो सुरांसंगे
नाद होई अनिवार।
जा किरणांनो नयनांसंगे
क्षितिज होई अभिचार।
त्या अनिरुद्धा भिजवा
माझ्या अश्रूंनी अभिसार।
क्षणाक्षणा अभिजित असावा
अचलित चल निस्पंद
आमचे आमचे अनिरुद्ध ॥२॥
जा मोहांनो लाभासंगे
एकचि मोक्ष असार।
जा कर्मांनो फलितांसंगे
सर्वचि प्राप्त अपार।
ह्या अनिरुद्धा अर्पा
माझ्या मुक्तीचा भवभार।
कणाकणां अभिषिक्त असावा
अघटित घट निर्बंध
आमचे आमचे अनिरुद्ध ॥३॥
तिमिरातूनी पसरुनिया बाहू,
आले ते उजळीत
भक्तिरसांनी प्रगटित होऊनि
येती अनिरुद्धऽऽऽ, आमचे आमचे अनिरुद्ध ॥
राधे कृष्ण, गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, गोपाल कृष्ण