Lyrics of Thakale Re Bapu from album Vaini Mhane

7. थकले रे बापू ओढता संसार
थकले रे बापू ओढता संसार
बापू, आता दे विश्रांती तुझ्यापायी ॥ धृ ॥
तुझीया छायेत राहिले निवांत
सुखाचे दिवस फक्त तूची दावीले
बापू आला आणि जाहले निश्चिंत
सकळ व्यवस्था तूची दाविली ॥ 1 ॥
याचना करावी कधी ना लागली
तुझीया भांडारे सर्वकाही
वैनी पहिल्यांदा मागते स्वहित
सामीप्याची ओढ पुरवावी ॥ 2 ॥