Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Teenahi Kaali Bapu Smarava from album Pipasa 4

Lyrics of Teenahi Kaali Bapu Smarava from album Pipasa 4

तीनही काळी बापू स्मरावा



तीनही काळी बापू स्मरावा,
घेई हाचि एक वसा॥

सूर्य उगवतो मावळतो चंद्र दररोज वेगळा
धन देई सुख तेचि होई दुःख
हा एकचि बापू आगळा,
नित्य आहे जसा तसा॥

बाळपणी नुमजे काही यौवनाची सारी घाई
प्रौढपण येता येईना वृद्धत्व आदळे माथा
जर संगती बापू असता,
नसता हा गोंधळ झाला॥

फुले फुलती वेळोवेळी फळे डवरती ऋतुकाळी
गंध न पसरला कधी मनी रस न बहरला कधी जनी
रसगंध बापूस देता,
पुरून उरे जन तन मना॥

झोक्यावर झोका घ्यावा झोका उंच उंच न्यावा
दोनही दिशांनी वरवर जातो तेव्हाचि मेघ जवळी येतो
पिप्याचा झोका बापू,
पिप्याचे गगनही सारे बापू॥