Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Tav Kirtansari from album Pipasa5

Lyrics of Tav Kirtansari from album Pipasa5

तव कीर्तनसरी



तव कीर्तनसरी भिजविती मजला, नेती कर्मापार ।
शब्द, सूर अन् अर्थ बरसती, बापू तुझा भांडार ॥धृ॥

ऋषी मुनी हे गाती तुजला, मी वेडा लाचार ।
कवन करावे म्हणूनी बसता, तू दिसला साकार ॥१॥

अश्रुसरींनी भिजवूनी हृदया, केला मग उच्चार ।
नाम-झरे मग वाहू लागले, ना तीर ना बंधार ॥२॥

झर्‍यासंगे मजसी नेले, केला मूळे कुठार ।
प्रारब्धाचा नाश करूनी, सद्गुण देई अपार ॥३॥

पिपा सांगतो शपथ घेऊनी, बापू खरा दातार ।
पुरवितो हा सर्व मागणे, प्रेमळ अपरंपार ॥४॥