Lyrics of Sukhakarta Dukhaharta from album Ganapati Aarti

सुखकर्ता दुःखहर्ता
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
हो श्रीमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरं चरणीं घागरिया || २ || जय देव...
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ||
सरळसोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥ जय देव...