Lyrics of Sukhada Vyom Zhar Barasat Aale from album Ailatiri Pailatiri

13. सुखद व्योम
सुखद व्योम
झर बरसत आले
सुखद व्योम झर बरसत आले आनंदाचे सूर
ऐक रे अनिरुद्धाचे गान ॥
फुलवित जीवन सर्वांगाने।
ग्रीष्म शिशिर ऋण संपविण्यातें।
रित्या नद्या अन् भकास डोंगर।
करीत तुझे जयगान ॥
जाई जुईचे मांडव सुंदर।
लेतिल हिरवे लेणे तरुवर ।
निसर्गराजा होऊन व्याकूळ।
करीत तुझे जयगान ॥
नभार्णवातील अनल शलाका ।
मेघ गवाक्षी अनिल पंथिका ।
वरुण भानु तम भावुक होऊन।
करीत तुझे जयगान ॥
रुक्ष वाळुरण मानस माझे ।
भक्ती जलाचे सिंचन व्हावे ।
पुलकित होऊन गाईन गाणे ।
करील तुझे जयगान ॥
सुखद व्योम
झर बरसत आले
सुखद व्योम झर बरसत आले आनंदाचे सूर
ऐक रे अनिरुद्धाचे गान ॥
फुलवित जीवन सर्वांगाने।
ग्रीष्म शिशिर ऋण संपविण्यातें।
रित्या नद्या अन् भकास डोंगर।
करीत तुझे जयगान ॥
जाई जुईचे मांडव सुंदर।
लेतिल हिरवे लेणे तरुवर ।
निसर्गराजा होऊन व्याकूळ।
करीत तुझे जयगान ॥
नभार्णवातील अनल शलाका ।
मेघ गवाक्षी अनिल पंथिका ।
वरुण भानु तम भावुक होऊन।
करीत तुझे जयगान ॥
रुक्ष वाळुरण मानस माझे ।
भक्ती जलाचे सिंचन व्हावे ।
पुलकित होऊन गाईन गाणे ।
करील तुझे जयगान ॥