Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Sukarache Lekure from album Pipasa 1

Lyrics of Sukarache Lekure from album Pipasa 1

७. सूकराचे लेकुरे



सूकराचे लेकुरे मस्त वोरडा घातिला ।
चिखलाच्या नंदनवनी त्यासी आनंद जाहला ।
सर्व अंग माखूनिया मस्त लोळे विष्ठेमाजी ।
कोणी जवळी ना करी, नाही लाज त्याची धरी ।
पशुजन्मी भोगयोनि त्यासी सुटका हो कैसी ।
तुवा मिळाला नरजन्म, सांडू नको ऐसा व्यर्थ ।
बापू भक्तिविण नाही, दुजे सार ह्या जीवनी ।
पिपा लोळत होता मळी, त्यासी उध्दरिले झणी ॥