Lyrics of Sudur Mand Rati from album Ailatiri Pailatiri

3. सुदूर मंद राती
सुदूर मंद राती मी साद ऐकीयेली।
कुठून नाद येई ही बासुरी कुणाची ॥
सुदूर मंद राती मी नाद ऐकीयेला ।
कुठून साद येई हा डमरु हो कुणाचा ॥
अंधारगर्भज्योती मी लाविताच विझल्या।
निपटीत अश्रु नयनी या पापण्याही मिटल्या ॥
अस्नेहगर्भज्योती मी लाविताच बुझल्या ।
विपरीत कर्म वरुनी सद्भावनाही तुटल्या ॥
सुकली अनंत पुष्पे काटेच वाढले ते ।
ह्या निसटत्या क्षणाला हे गंध कुठूनी आले ॥
निबिड घोर रानी मति मार्गभ्रष्ट झाली ।
ह्या निरवत्या क्षणाला ही भाक कुठूनी आली ॥
झाल्या सजीव कलिका ह्या अकुल कुंदराशी ।
अनिरुद्ध पाहिला मी अनिरुद्ध वंदिला मी ॥
झाल्या सजीव मनीषा मज प्राप्त वीरवृत्ति ।
अनिरुद्ध पाहिला मी अनिरुद्ध वंदिला मी ॥