Lyrics of Soduniya Dharma from album Pipasa 1

२३. सोडूनिया धर्म
सोडूनिया धर्म । बुडविले देव ।
फेडूनिया वस्त्र । जाहलो निर्लज्ज ।
काळे फासले तोंडा । पायावरी धोंडा ।
गळ्यामध्ये वहाणमाळा । गर्दभी सोहळा ।
ऐसा नटूनी पिपा । सरणावर सती गेला ।
बापू चरणी उमटला । बापूकृपे ।