Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Shadaripu Jhaale from album Pipasa 2

Lyrics of Shadaripu Jhaale from album Pipasa 2

षडरिपु झाले बहु उपकारी

षडरिपु झाले बहु उपकारी ।
अजातशत्रु मी झालो ॥ धृ ॥

मत्सर वाटे चरणधुळीचा ।
बिलगून राही त्या पायांना ।
लोभ जडला त्या पायांचा ।
लोभ वाढत राहो ॥ १ ॥

क्रोध लई मज विभक्तीचा ।
आडवी येई जवळ जाण्या ।
सावळ्याचा मोह मोठा ।
त्यातचि मी गुरफटलो ॥ २ ॥

काम एकचि दासपणाचा ।
का मी कामी कामनांचा ।
मद भरला मोक्षमुक्तिचा ।
मोक्षातूनी मी सुटलो ॥ ३ ॥

एकही दुर्गुण न त्यागता ।
मनास माझ्या ना रोकता ।
पिपास आली शत्रुमित्रता ।
बापूशरण पावलो ॥ ४ ॥