Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Shaamal Sundar from album Pipasa 2

Lyrics of Shaamal Sundar from album Pipasa 2

श्यामल सुंदर हृदयी पळभर


श्यामल सुंदर हृदयी पळभर
शुध्द जाहली काया
देई जीवनछाया ॥ धृ ॥

प्रभुचरणा नयनी सांठविता ।
दु:ख वेदना नुरल्या आता ।
येई सुखाला येई धीराला ।
अनिरुध्द अवघा ॥ १ ॥

टाळ वाजता हाचि नादु ।
चवी चाखता हाचि स्वादु ।
हाचि गारवा आणि उष्णता ।
अनिरुध्द अवघा ॥

नामी रंगलो प्रेमी बुडालो ।
कधी कसा मी माझा नुरलो ।
मीच ह्याचा हाचि माझा ।
अनिरुध्द अवघा,
पिपाचा अनिरुध्द अवघा ॥