Lyrics of Sawalya Re Ghananila from album Pipasa 1

१३. सावळ्या रे घननीळा
सावळ्या रे घननीळा नको दूर ठेवू
अनिरुध्द अनिरुध्द हाचि माझा श्वासु ॥ धृ ॥
टाहो फोडितो अंबरी तरी न येसी देवा ।
हंबरतो तान्हा तुझा तुला शोधताना ।
मातीलागी माती होवो, राखेलागी राख ।
कैवल्याच्या जीवलगा हवी एक हाक ।
कष्टवितो तुजला मी रे ठाऊके मलाची।
तरी मन मानत नाही पिपासा ही तुझी ।