Lyrics of Saundaryachi Pariseema (2) from album Pipasa 4

सौंदर्याची परिसीमा
सौंदर्याची परिसीमा तू।
स्मित तुझे हळुवार।
कां लाविले वेड मला तू।
मी असता निस्सार॥
स्वप्नामधला मित्र लाडका।
जीवनी साथीदार।
शोधून शोधून दमलो होतो।
उघडले तू दार॥
प्रेम तुझे मी भरू कशात।
येई हाच विचार।
अचिंत्यदानी भक्त-सखा तू।
दिले मला भांडार॥
मनची केले शांत माझे।
चित्त निरहंकार।
असे काय मी दिले तूजला।
आठव ना तिळभार॥
तुझेच प्रेम अन तुझेच देणे।
भरण्या तूची आकार।
पिपा मागतो रंग अरंगी।
तातरंगी रंगणार॥