Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Sarva Janma Saartha Zaala from album Pipasa 3

Lyrics of Sarva Janma Saartha Zaala from album Pipasa 3

सर्व जन्म सार्थ झाला



सर्व जन्म सार्थ झाला।
पाहता गाता अनिरुद्धा॥

दुष्ट ग्रह गेले वाया।
बदलल्या हस्तरेखा॥
नाही ताकद कुणाला।
माझी पारध कराया॥

पाप-पुण्य तुझ्या चरणा।
वाहुनीया मी मोकळा॥
सर्व दिशा व्यापोनीया।
उरी शिरूनी प्राण झाला॥

श्‍वास-ध्यास तुझा माझा।
एक होवोनी राहिला॥
पिपा म्हणे बा अनिरुद्धा।
असाची तू हो सकळांना॥