Lyrics of Sarva Bajunni Jari Dekhile from album Pipasa 4

सर्व बाजूंनी जरी देखिले
सर्व बाजूंनी जरी देखिले, तरी न आकळे रूप तुझे।
मग ओळखू कसा तुला रे, दिस रे बापू दिस मला॥
रंग सावळा, मी बावळा अंधारातचि आहे रे।
घाल हाक तू, धावत येईन आवाजाच्या दिशे॥
शब्द तुझा रे, कानी येता कान लागले पाहू।
परि पाय हे उचलत नाही, कसा कुठे मी धावू॥
तुझ्या दोरीचा पाश बांधूनी, खेचूनी घे रे मजला।
ऐसे वदता धावू लागले, पाय न उरले माझे॥
धावत धावत आलो जवळी, कवळी तो मज हृदयी।
त्याचे स्पंदन होता माझे, विरघळले मन गळले॥
पाय, कान की डोळे सगळे, अवघी ताकद ह्याची।
पिपा नाचतो रूप पाहूनी, तुम्ही नाचा तैसे॥