Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Sanj Vel Chya Re Varya from album Gajtiya Dhol

Lyrics of Sanj Vel Chya Re Varya from album Gajtiya Dhol

8. सांज वेळच्या रं वार्‍या



  सांज वेळच्या रं वार्‍या, जा रं नंदावहिनी कडं ।
जाऊनीया सांग तिला, माझ्या मनाची रे गोठ ॥धृ॥

  जगा मंदी खरं न्हाई, मी गं हाय लेकुरवाळी ।
मागते गं तुझी छाया, माझ्या सर्व घरावरी ॥१॥

  माझे माहेर सुटले, बापे सासरी धाडीले ।
काळजी गं माहेराची, माझे मन कातरते ॥२॥

  तुझे रुप आठवता, होई जीवाला शांतता ।
भिती भविष्याची जाई, तुझी भक्ती आचरिता ॥३॥

  आईचं गं मनोगत, तुझ्या वीण कोण जाणे ।
घालमेल हृदयाची, सांगते गं प्राणपणे ॥४॥

  बाईच गं कसं जीणं, चारी बाजू येई शिणं ।
घ्यावया आराम, नाही कोणी तुजवीण ॥५॥