Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Samrasuni Saad Ghaal from album Pipasa 4

Lyrics of Samrasuni Saad Ghaal from album Pipasa 4

समरसूनी साद घाल



समरसूनी साद घाल, लावूनिया हृदयी ज्योत।
सावळा धावेल हा, कळवळोनी ओतप्रोत॥
कैशी ऐकू येईल हाक, नाही हा तुला विचार।
प्रेम देई प्रेम घेई हाच एकला करार॥
रवि उदेल पश्‍चिमेस, नदी पर्वता चढेल।
हा न सोडी ब्रीदास, म्हणवी मी भक्तदास॥
टाकूनिया खेदाची कात, उजळूनी घे अंतरंग।
मग मुरलीचे सूर, तुझ्यासंगे बोलतील॥
पिपाचा टाळ मनाचा, दो बाजूंनी वाजविता।
ह्याने भूपाळी म्हणूनिया, उषःकाल नित्य केला॥