Lyrics of Samori Baisala Kaisa from album Pipasa 1

२. सामोरी बैसला कैसा
सामोरी बैसला कैसा। मज दिसला बापूराया॥
आजि पहिले भेटी ऐसा। कैसा सुदर्शनी सोहळा॥
बघता बघता हरले ध्यान। दिसे शंख चक्र बाण ॥
गदा फेकली मजवरी । नाजूक स्पर्शाची मोहरी ॥
हा राम कृष्ण सावळा । हा बाळ विटेवरला ॥
रांगत रांगत आला हरि । त्यासी घेतले सत्वरी ॥
पिपा संपला कायमचा । देवा काया वाचा तुमचा ॥