Lyrics of Sakhya Aniruddha Premala from album Pipasa Pasarali

सख्या अनिरुद्ध प्रेमळा
सख्या अनिरुद्ध प्रेमळा रंग प्रेमाचा सावळा ॥ धृ ॥
मीरेसाठी हलाहला प्राशुनिया होसी काळा
नाथासाठी राबतोचि सख्या श्रीखंड्या सावळ्या ॥
गाथा तारितो तुक्याची पाटी उचली चोख्याची
हर काम करी जनीचे बापू माझा पूर्णकाम ॥
सोयरेचा भाकरतुकडा सेवी नामयाची खीर
चालवितो हातमाग बापू कबीराचा आराम ॥
सुशीलाताईंचा विसावा लीलाताईंचा जिव्हाळा
द्वारकामाईंच्या प्रेमळा बापू पंढरी गोपाळा ॥
सर्वाधिक कष्टविले मी मीच तुजलागी देवा
योग्यासाठी सोसे ताप रापला हा देव माझा ॥