Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Sakhya Aniruddha from album Pipasa 4

Lyrics of Sakhya Aniruddha from album Pipasa 4

सख्या अनिरुद्धा



सख्या अनिरुद्धा दूर नको राहू।
एकलेपणा हा भिववी मजला॥

आम्ही हीन-दीन कलीने छळियेले।
कसे सांग वाचू तुझ्याविण॥

दिसे, भासे जैसे तसे नसतसे।
म्हणूनी रे पडलो कड्यावरूनी॥

देही त्राण नुरले दरी ही चढाया।
संकटश्‍वापदे ओढत नेती॥

जरी बसलो शांत धरूनी एकांत।
तरी त्रास देत, मानवी भूते॥

आम्हा कलिग्रस्ता तुजविण कोण।
जरा लवकरचि ये रे माझ्या देवा॥

अद्वैताचे बंड, पाखंड भक्तांस।
घे धाव कडेवर ठेवी पिपास॥