Lyrics of Sakar Saguna from album Pipasa 2

साकार सगुणा क्षमावंत देवा
साकार सगुणा क्षमावंत देवा
मज जवळी घे रे, घेरे कृपाळा ॥ धृ ॥
चोहो दिशा मी तुझ्यापाशी आलो ।
तुझ्यापाशी आलो, तुला मागण्या ॥ १ ॥
नाही जर वाणी नाम तुझे
नाही जर हाती काज तुझे
मग काय उरले जीवनी ह्या सखया ॥ २ ॥
नको भीड ठेवू नको मागे सरकू
नको मागे सरकू, तू चिरण्या ही छाती ॥ ३ ॥
बापू अनिरूध्दा मज आठवावे
तू आठवावे जरी मी विसरलो ॥ ४ ॥
कसे काय मागू फक्त तूचि हवा रे
फक्त तूचि हवा रे ह्या पापियाला ॥ ५ ॥