Lyrics of Sakal Soor He Manaat from album Pipasa 4

सकल सूर हे मनात
सकल सूर हे मनात, मर्म होय रागिणि।
वर्मांची जखम खोल, अश्रू येत लोचनी॥
भ्रम-भ्रांत क्षणा क्षणात, नमिळे पळही शांत।
भाव-रंग तना मनात, उपजताचि सुकूनी जात।
मात्र अनिरुद्ध एक, उमलवि कमलिनी॥
जग तसेच, जनही तेच, टोच तशीच मारिती।
जखमांना भरण्याला, ना देत विश्रांती।
मात्र अनिरुद्ध एक, सुकवी जखम फुंकूनी॥
सर्व जुन्या जन्मांचे, कर्म आदळे शिरी।
पुण्य करिता पाप होय, नसले जरी अंतरी।
मात्र अनिरुद्ध एक, आड येई धावूनी॥
मीच मला शोधतो, हरवतो सोडतो।
निर्धार करूनी एक एक, मीच ते बुडवितो।
पिपा असे भाग्यवान, बापू नेई तारूनी॥