Lyrics of Sahaj Sukha Tuzhya Name from album Ailatiri Pailatiri

10. सहज सुख तुझ्या नामे
सहज सुख तुझ्या नामे ।
आम्हा हेचि एक धर्मे ।
होऽबापू बापू वदे नेमे ।
सर्व कार्य होई तेथे ॥
नमन तुज नटवरा ।
अरे वृत्तीच्या खट्याळा ।
राहो नित्य नाम गळा ।
तुझ्या अंगी नाना कळा ॥
तू ठकचा रे ठकु ।
तू चोराचाही चोरु।
तुला नावे किती ठेवू ।
तरी तूचि रे लाडकु ॥
नित्य नवीनचि रुप।
कधी दाखविसी कोप ।
तरी नाही घाबरत।
तू माझाचि रे बाप ॥