Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Sadguru Shree Runadnyapak Stotra from album Sadguru Shree Aniruddha Runadnyapak Stotra

Lyrics of Sadguru Shree Runadnyapak Stotra from album Sadguru Shree Aniruddha Runadnyapak Stotra

सद्गुरु श्रीअनिरुद्ध ऋणज्ञापक स्तोत्र



अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो॥
चौऱ्याऐंशी लक्ष योनींत फिरलो
शेवटी मानवाच्या जन्मासी आलो
तरीही मी तुझ्या कृपेस पात्र झालो
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

जन्मान्तरी मी किती पाप केले
या जन्मीही तेचि गिरविले
मज तू तरीही जवळी घेतले
अधमाधम मी तुझा भक्त झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

कधी न घडली सत्संग, सेवा
कधी न स्मरलो देवाधिदेवा
कधी ना मिळाला जीवा विसावा
तुझ्या दर्शने मी सुखात न्हालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

मन्युष्यदेही पशुचीच वृत्ती
सदैव दैत्यासम ही आसक्ती
नाही विवेक, नाही विरक्ती
असा पतित मी तव नामेचि तरलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

सदा प्रेयविषयी लोलुप झालो
श्रेयासी तेणे परामुख झालो
असा शत्रु माझा स्वये मीच झालो
तेवोपदेशे सावध आजि झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

रसातिलोलुप माझी ही रसना
कठोर बोलून दुखवी जनांना
सदैव वदते असत्य वचना
तुझे नाम घेता वाक्शुद्ध झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

मनात येती विकल्प नाना
वैषयिक गुंता सुटता सुटेना
स्थैर्य आणि शक्ती, मना मिळेना
तुझे ध्यान करिता मनी समर्थ झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

वृथा चोज करुनि पोसले हे शरीर
काये न केले मी परोपकार
किती भोगपंकात रुतलो गंभीर
तुझ्या चरणस्पर्शे आज मी उद्धरलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

कुतर्कयोगे मती भ्रष्ट झाली
यथासंचिते ती विपरीत झाली
अतीचिकित्सेत ती व्यर्थ शिणली
तू ठेवता हात स्थितप्रज्ञ झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

बुद्धीच्या मदाने उन्मत्त झालो
वितंडवादात अडकूनी गेलो
मीच तो शहाणा ऐसे समजलो
आज तव कटाक्षे अहंशून्य झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

जोपासिला मी किती अहंकार
विवेक विझला, दाटला अंधकार
गुंता तमाचा विणला सभोवार
तुझ्या दिव्य तेजे प्रकाशी उजळलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

सेवा न घडली मातापित्यांची
दुरुत्तरे हृदये दुखवली मी त्यांची
गाठली मी सीमा कृतघ्नतेची
असा कृतघ्न मी तव पायाशी आलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

गुरुवरिष्ठांस अवमानिले मी
आप्तेष्टमित्रांस निर्भर्त्सले मी
स्वतःचेच म्हणणे केले खरे मी
असा दुष्ट मी तव दर्शनासी आलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

परदुःख पाहूनी दाटला न ऊर
आले न माझ्या नयनात नीर
किती निर्दयी मी होतो कठोर
तरी तुझ्या दयेच्या छायेत आलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

आहार, निद्रा, भय कामी बुडालो
मी पुच्छविहीन पशूच बनलो
फिरता फिरता तुझ्या दारी आलो
तुझ्या दारी येताच माणूस झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

किती आधिव्याधी तू केल्यास शांत
रक्षिलेस मजला घोर संकटात
विसरलास ना मला तू अहोरात
स्मर्तृगामी बापू, दत्तगुरु ओळखलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

वाहे प्रेमगंगा तुझ्या महाद्वारी
नवस्वरात वाजे तुझी भक्तिबासरी
अज्ञानछेत्रा तूच त्रिपुरारी
अनिरुद्धरूपे हरिहरास भेटलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

तुला दोन पैसे देता मी सत्वर
तू नऊ रुपयांचा दिलास हार
न कळे असा कसा बापू सौदागर
उलटी तुझी खूण हे मी समजलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

नावाचा योगीन्द्र पण मी करंटा
मजसाठी का तू सोसतोस तोटा
खरोखर देवाहून सद्गुरुच मोठा
अकारण करुणा तुझी अनुभवलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

जसे चिडीच्या पायास दोर
बांधूनी आणिती तिजला समोर
तसेच मज तू ओढले खरोखर
तुला काळजी माझी हे मी उमगलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

तुझ्या प्राजक्तापुढे फिका कल्पवृक्ष
दे ठाव गुरुपदी, नको स्वर्ग रुक्ष
तुझ्या पायी राहीन, नको मजसी मोक्ष
मला तू हवास, हेच मागण्यास आलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

तुझे नाम गाऊ, कीर्तनात नाचू
तुझ्या चरितातील अमृतकण वेचू
भवार्णव लंघूनि तुझ्या दारी पोचू
तुझ्या नामनौकेत मौजेत बैसलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

तू आणि मी बापू, मिळता स्वभावे
साहजिक अद्वैत घडूनी यावे
अशक्य ते शक्य तूचि घडवावे
तुझ्या अनंत लीला पाहण्यात रमलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

उठल्या कितीही विकल्पलहरी
विरून जातील धरिता सबूरी
पाय सद्गुरुंचे सोडू नये तरी
गुरुपायी सारे उपाय लाधलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

मी यत्न करीता मज उद्धारासाठी
उभे घेऊनि बापू दुधाची वाटी
किती बापू भक्तार्थ करती अटाटी
भक्तवत्सला तुज मी शरण आलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

टेकता मी माथा तुझिया पायाशी
प्रेमे  तू धरिसी मजला पोटाशी
जशी माय सांभाळी निजबालकासी
बापू जगदंबे, मी तुझा बाळ झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

चमत्कार घडविसी असंख्य वेळा
परि तू राहसी नामानिराळा
कोण जाणे तुझी अपरंपार लीला
जगद्गुरु कृष्णा, मी तुझा गोप झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

मनी स्थापिले भावसिंहासनास
पायघड्या म्हणूनि अंथरीला ध्यास
प्रतिष्ठित व्हावे विनंती आपणास
बापू विराजीत होता सुखावलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

मदर्थ झटतो किती बापू माझा
योगक्षेम वाही वैकुंठराजा
सांग कसा होऊ उतराई तुझा
स्मरूनी ऋणांना तुझी वहाण बनलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

तुझी वहाण होण्यात माझाच स्वार्थ
सोपविला तुज मी भारचि समस्त
पुरविला मद्हेत तू होऊनी मुदित
त्वत्कृपे स्वार्थात परमार्थ साधलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

सद्गुरु हा चंद्र असे पौर्णिमेचा
बाधे न क्षय ज्या कलादिकांचा
सदा वर्षतो रस भक्तिसुधेचा
गुरुपूर्णचंद्राचा मी चकोर झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

गुरुपौर्णिेची तिथी ही पवित्र
बरसावे गुरुऋण स्मरूनी नेत्र
फिटे न गुरुऋण करू स्मरणमात्र
नित्य मी गुरुऋणी गुरुरंगी रंगलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

गुरुची कृपा हीच गुरुपौर्णिमा हो
प्रतिक्षणी आम्हा अनुभव लाहो
गुरुच्या ऋणांचे अखंड स्मरण राहो
गुरुमाऊलीच्या ऋणी मी बुडालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

गुरुदक्षिणा मी तुला देऊ काय
चराचर व्यापून उरती तुझे पाय
माझे तरी काय तुझ्याशिवाय
तुझा मी तुझ्यातच समर्पित झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

येई बा बापू, नको वेळ लावू
तुझ्या विरहाने व्याकुळला जीवू
प्रेमे दोन अश्रू तुझ्या पायी वाहू
हे कृतज्ञतेचे तीर्थ मधुर प्यालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

अडाणी मी उपमा तुला काय देऊ
तुझे स्तवन कोणत्या शब्दात गाऊ
त्यापेक्षा तुझे पाय धरूनी ठेवू
हेच एक आम्ही करूनी निमालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

एक परवलीचा आमुचा असे शब्द
हृदयात आमुच्या असे एक साद
अनिरुद्ध अनिरुद्ध हेच आम्हा ब्रीद
अनिरुद्ध म्हणता भागवती झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

अनिरुद्ध अनिरुद्ध आमुचा जपतपू
तुझे नाम घेता नासती षड्-रिपू
ऐसा जनार्दन अनिरुद्ध बापू
अनिरुद्ध नामे अभयदान पावलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

महायती तू महाप्राण बापू
महाविष्णू तू परमशिव बापू
जगदम्ब तू सद्गुरुतत्त्व बापू
सर्वत्र मी तुझे रूप पाहू लागलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

कर्दळीवनीचा वटवृक्ष बापू
सद्गुरुस्थानीचा निम्बवृक्ष बापू
सद्गुरुतत्त्वाचे प्राकट्य बापू
पटता तुझी खूण मी गहिवरलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

बापू एक माझी विनंती परिसावी
गुरुचरणऋणी मज नित्य ठेवी
कृपा सर्वांवर ऐशीच रहावी
मी गुरुकृपेचा याचक एक झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

तुझे वाक्य आमुचे महाकाव्य होवो
तुझे प्रेम चित्ती उसळूनी येवो
मी तुझा, तू माझा, दाटो हा भावो
तुझ्या चरणांशी एकरूप झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

गुरुऋणज्ञापक हे स्तोत्र गाई
तो गुरुपदीचा रहिवासी होई
अनन्यत्वे त्यास गुरुराज पाही
गुरुस्फूर्तीने मी सत्य तेच वदलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

अनिरुद्ध स्वये ही स्तोत्रजान्हवी
भक्तोद्धारार्थ मन्मुखे वदवी
योगीन्द्र हा दास अक्षरे गिरवी
गुरुचीच गरिमा गिरवीत गेलो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो ॥

इति श्रीसद्गुरुऋणज्ञापकस्तोत्रं सम्पूर्ण् ।
सद्गुरु श्रीअनिरुद्धार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥