Lyrics of Sadguru Daaricha from album Pipasa Pasarali

सद्गुरुदारीचा आहे मी हो श्वान
सद्गुरुदारीचा आहे मी हो श्वान। तेचि माझे स्थान सर्वकाळ ॥ धृ ॥
बापू भरवितो भक्तिची भाकरी। तियेचि माधुरी काय वानू ॥
गुरूची जी उष्टी असे पत्रावळ। मज ती रसाळ सुधेहूनी ॥
प्रेमाची शृंखला बांधता मी गळां। जुळली कमळां नाळ जैसी ॥
सुंदर जगात बापूंचे चरण। त्याचे निरीक्षण छंद माझा ॥
धनीच करतो श्वानाचे रक्षण। उलटी ही खूण त्याच्या घरी ॥
योगीन्द्र मागतो हेचि एक दान। होवो तुझा श्वान जन्मोजन्मी ॥