Lyrics of Rusun Basla Bapu Majha from album Pipasa 1

६. रुसून बसला बापू माझा
रुसून बसला बापू माझा कोणा कोपर्यात ॥
नंदामाई आणा त्याला बळे बळे परतून ॥
खट्याळ हरि हा खोड्या करितो ठकवी जागोजाग ॥
परि पकडता गुस्सा करतो पळून जातो खास ॥
भूलभुलैया ह्याचा भारी तुला जरी हा दोष ॥
तूचि दाखवी मार्ग हयांतूनि तोडूनि सारे कोष ॥
नटनाटकी दावी वाकुल्या भिववी छाया रंग ॥
पिपा पकडतो पदर तुझा गे दावी मज श्रीरंग ॥