Lyrics of Roop Paahta Saavale from album Pipasa 4

रूप पाहता सावळे
रूप पाहता सावळे।
डोळस होई मन आंधळे।
मन धावे मग सत्वरे।
पडण्याचे भय ना उरे॥
जेथूनी पतनाचे भय नसे।
ऐसे शिखर आम्हां गवसे।
पुरुषार्थ पर्वतशिखरे।
आम्हां नेई धरूनी करे॥
धावे संगे पळे पूढे।
आम्ही थकता घेई कडे।
घसरते पाऊल जरी वाकुडे।
दरीत ह्याचा कुणी न पडे॥
फळ हे केवळ दर्शनाचे।
तर काय वर्णू ध्यानाचे।
पिपा मूक होऊनी नाचे।
डोळे झाले अनिरुद्धाचे॥