Lyrics of Ram Krishna Ek from album Pipasa Pasarali

राम कृष्ण एक जरी दोन काया
राम कृष्ण एक जरी दोन काया । तैसा विठुराया अनिरुध्द ॥ धृ ॥
अनिरुध्द विठ्ठल बापू पांडुरंग । एक अंतरंग उभयांचे ॥
विटेवरी उभा बापू समचरण । रुक्मिणीरमण पति नंदेचा ॥ १ ॥
खट्याळ हा देव आम्हा बाळकृष्ण । देहुडाचरण तोचि बापू ॥
योगीन्द्र भुलला ठेला जैसा अली । चरणकमली स्थिर झाला ॥ २ ॥