Lyrics of Pushpa Umalale Je Majhe from album Pipasa 1

५. पुष्प उमलले जे माझे
पुष्प उमलले जे माझे । वाहिले तुलाचि।
तुला तुझे देतानाही । भरूनि मीच राही ॥ धृ॥
माझे तरी काय असे । सर्व तुझेचि रे देवा।
तुझे असो तुझ्यापाशी । मीच होय तुझा ॥ १ ॥
बापू बापू माझे गाणे । अनिरुध्द ताल।
गाऊ नाचू तुझ्या रंगे । सदा सर्वकाळ ॥ २॥
धन्य धन्य झालो आम्ही । सुखे सर्व ठायी।
पिपा काही बोलत नाही । जिह्वा तुझे पायी ॥ ३॥