Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Pratham Paahile Tula from album Pipasa 3

Lyrics of Pratham Paahile Tula from album Pipasa 3

प्रथम पाहिले तुला


प्रथम पाहिले तुला। आकर्ण नयन फाकले।
रोखून तू पाहता। सर्व भान हरपले॥

व्यसन मग लागले। पुनः पुनः पाहणे।
दादाच्या शब्दांतील। गुणरूप तुझे देखणे॥

आजही सकळांची। तीच स्थिती होतसे।
तुझीया नामाने। बांधीयले किती कसे॥

मार्ग सवे चालता। हात तूचि पकडला।
शब्द ही न बोलता। बदलले किती मला॥

प्रेम तुझे झेलण्या। जीव हा आतुरला।
जाहलो वेडापिसा। पाहूनी तुझ्या लीला॥

सुचितने दिला मजला वसा।
अनिरुद्धार्पण जाहला हा पिसा॥ (आलाप)