Lyrics of Prarabdhache Beej from album Pipasa Pasarali

प्रारब्धाचे बीज बापुच्या चरणी
प्रारब्धाचे बीज बापुच्या चरणी
अर्पण करूनी धन्य व्हावे ॥ धृ ॥
जैसी त्याची इच्छा तैसे अंकुरेल
सारेचि मंगल त्याच्या पायी ॥
सारी बीजे त्याच्या पायाशी वडाची
होती ऐसी त्याची माव आहे ॥ १ ॥
ब्रीद राखी कोण अनिरुध्दावीण
परिणती पूर्ण करी तोचि ॥
योगीन्द्र पाहतो सोपी पायवाट
कशास आटाट अन्य करा ॥ २ ॥