Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Pipa Mhane Majhi from album Pipasa 2

Lyrics of Pipa Mhane Majhi from album Pipasa 2

पिपा म्हणे माझी कोरी ढोर वाट



पिपा म्हणे माझी कोरी ढोर वाट
तू माझा गुराखी, मी ढोर रे ॥

एका गुरामागे दुजे ढोर जाई
त्याने बनविली वहिवाट रे ॥
माझ्या पुढे कोणी, कोणी ढोर नाही
वाटे सर्व गेली संतमंडळी रे ॥

संतांची पाऊले ना उमटती कधी
वाट ही राहिली सारी कोरी रे ॥
वाट जशी कोरी पिपाही हो कोरा
राहू मागे ढोर जन्मोजन्मी रे ॥ ४ ॥