Lyrics of Pipa Labaad from album Pipasa Pasarali

पिपा लबाड हा
पिपा लबाड हा बघ ना बापू लपवुनी बसतो ताट
उष्टे शीतही मज ना देई किती पाहतो वाट ॥ धृ ॥
इतुका ठकवी ठक हा मजला उष्टा कणही न देई ॥
धरिता हट्टा अवचित सोडूनि दडूनि कोठे जाई ॥ १ ॥
सांडू नको रे पिपा मजला घोर लागला जीवा ॥
प्राण पोरका तुजवीण माझा जाण जिव्हाळ्या भावा ॥ २ ॥
नाही मागणे काही आता तुझ्यात मजला गोडी ॥
योगीन्द्राच्या भावामध्ये तुझीच माया वेडी ॥ ३ ॥