Lyrics of Paus Padla Chikhal Jhala from album Vaini Mhane

3. पाऊस पडला चिखल झाला
पाऊस पडला चिखल झाला अडवीला डोंगर
डोंगरामागे लपला आहे माझा अनिरुध्द ॥ धृ ॥
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द ॥
प्रेमाचा हा घननीळ रंग, घेऊनी आला गऽऽऽ
प्रेमासाठी आला खाली, सागरासी मिळण्यास ॥ 1 ॥
सागरासी मिळण्यास, आला साई अनिरुद्ध
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द ॥
नद्या मिळती सागराशी, आनंदाने गऽऽऽ
त्यापरी भक्त रिघतो, अनिरुध्द प्रेमात ॥ 2 ॥
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द ॥
ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट
आकाशातील चकमकी गं, प्रेम पाऊस पाडण्यास ॥ 3 ॥
प्रेम पाऊस पाडण्यास, आला साई अनिरुद्ध
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द ॥
हे इतुके प्रेम पहाणे, भक्तची हवा तसाच
बापू म्हणे ये तू मजपाशी, नको घाबरू ह्या नृत्यास ॥ 4 ॥
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द ॥
वैनी म्हणे तांडवनृत्ये दावी, आपुलीच खूण
असा असे हा माझा देव, तांडवात करी तारण ॥ 5 ॥
तांडवात तारण, करितो माझा अनिरुद्ध
माझा साई अनिरुध्द, माझा साई अनिरुध्द ॥