Lyrics of Parabhramhacha Abhayahasta from album Pipasa5

परब्रह्माचा अभयहस्त
परब्रह्माचा अभयहस्त तू, परांबेचा सुत ।
भर्गदीप तू भक्तजनांचा, गुरु तुझा अवधूत ॥धृ॥
अमुचा आत्मा तुझाचि अंश, तू अससी पूर्ण ।
मनास लावी रंग तुझारे, तू शामल वर्ण ॥१॥
त्रिशूळ शंख चक्र बाण, हस्तरेखा तुझ्या ।
ह्या हस्ताने थोपटी रे मस्तकी माझ्या ॥२॥
नेम धरूनी मार बाण रे, नको करू अनमान ।
जन्म माझा व्यर्थ जाणे, हा तुझा अपमान ॥३॥
आकाशाची करि तू पृथ्वी, अग्निसी करि जल ।
पिसा जाणतो सर्व अशक्य तुझ्या हातीचा मल ॥४॥