Lyrics of Panth Daavte Meenatai from album Vaini Mhane

13. पंथ दावते मीनाताई
पंथ दावते मीनाताई
जन्मृत्युसी उल्लंघुनिया
मीनली बापुपायी ॥ धृ ॥
साईनिवासी प्रेमसाऊली
अनिरुध्द भक्तांची माऊली
चैतन्याची नदी उसळती
जीवन फुलवीत वाही ॥ 1 ॥
सातत्याची प्रेमे सेवा
ध्यास बापुचा प्रेमळ जीवा
सामीप्याची ओढ मानसी
औक्षणी नित नवलाई ॥ 2 ॥
म्हणे, ‘‘लाडका देव हा माझा
बाळ श्रीहरी विश्वराजा
मैतर सुंदर हाचि जीवाचा’’
ओवाळीतची राही ॥ 3 ॥
ताई माझी तुळशी मधुरा
तूच गुरु गे खरा आसरा
अनिरुध्दी योग्या फोडी टाहो
भेट आता गं ताई ॥ 4 ॥