Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Paakharu Meghaat Shiruni from album Pipasa 4

Lyrics of Paakharu Meghaat Shiruni  from album Pipasa 4

पाखरू मेघात शिरूनी



पाखरू मेघात शिरूनी चिंब ओले जाहले।
जल पिताच मेघाचे पंख मला लाभले॥
मेघ अनिरुद्ध नाम, मजसाठी अभिराम।
सावळ्या नभातला हा, सावळा घनःश्याम॥
नामरूप एक असा हाचि चैतन्यधाम।
शरणझेप घेताचि होई मांगल्यधाम॥
चरण होत आकाश, नयनांचा प्रकाश।
विजयसूर्य नख ह्याचे, तोडितसे सर्व पाश॥
पाखरू मी स्वच्छंदी, पाश एक अनिरुद्धि।
जाहलो मी पूर्ण बंदी, विहरतो आनंदी॥
गुण तुझे वर्णू किती, क्षमे तुझ्या नाही क्षिती।
पिसा पाखरास गती, असो तुझ्या नामप्रिती॥