Lyrics of Pratham Pahile Tula - 2 from album Pipasa5

प्रथम पाहिले तुला
प्रथम पाहिले तुला । आकर्ण नयन फाकले ।
रोखून तू पाहता । सर्व भान हरपले ॥१॥
व्यसन मग लागले । पुनः पुनः पाहणे ।
दादाच्या शब्दांतील । गुणरूप तुझे देखणे ॥२॥
आजही सकळांची । तीच स्थिती होतसे ।
तुझीया नामाने । बांधीयले किती कसे ॥३॥
मार्ग सवे चालता । हात तूचि पकडला ।
शब्द ही न बोलता । बदलले किती मला ॥४॥
प्रेम तुझे झेलण्या । जीव हा आतुरला ।
जाहलो वेडापिसा । पाहूनी तुझ्या लीला ॥५॥
सुचितने दिला मजला वसा । अनिरुद्धार्पण जाहला हा पिसा ॥ (आलाप)