Lyrics of KshanaKshanatun - 2 from album Pipasa5

क्षणा क्षणातून
क्षणा क्षणातून माझे मीपण, वाहत असूदे तुझ्याकडे ।
वार्यावरती गंध जसा रे, पसरत राही चोहीकडे ॥धृ॥
उपवन माझे, गुलाब माझे मोगराही सुंदर खुलला ।
वसंतऋतूचा सुखद बहरही माझ्यासाठी तरतरला ।
शिशिर, ग्रीष्म मग पुढे सरकती, शुष्क जाहली तरु खोडे ॥१॥
पतंग माझा उंच उडाला, झाला चंद्रापरता ।
आकाशाला शिडी लावूनी, गर्व झाला चढता ।
कृष्णविवराने गिळले मजला, जीवन झाले कोडे ॥२॥
आठव करता त्वरीत आला अनिरुद्ध विवरात ।
क्षमा मागण्या संधीही नव्हती, विवर मला खेचत ।
अनिरुद्धाने गिळले विवरा, गर्वाचे घर खाली पडे ॥३॥
वाटे साधा मानव जैसा, म्हणूनी आम्ही फुगतो ।
सहज बोलही व्यर्थ न जाई, ऐकतो तो तरतो ।
मूळ ईश हा स्वामी त्रिलोका, असंख्य पुरावे पिपाकडे ॥४॥