Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aniruddha Rekhila - 2 from album Pipasa5

Lyrics of Aniruddha Rekhila - 2 from album Pipasa5

अनिरुद्ध रेखीला मानसी



अनिरुद्ध रेखीला मानसी । विश्‍व बदलले तत्क्षणी ।
हा भोळा शिवशंकर । नाही देतसे अंतर ॥धृ॥

सर्व किर्तने ऐकली । सकल शास्त्रेही धुंडली ।
कधी ना ऐसे अनुभवले । साकडे जन्माचे सुटले ॥१॥

शब्द दिले ह्याने दोन । नियती झाली मौन ।
नका हो सोडूया भान । धरू ह्या मंत्रे अभिमान ॥२॥

बापू आनंदी जाहला । करूनी अंबज्ञ लेकरा ।
अंबज्ञ बोलता आपण । अंबा देतसे कान ॥३॥

अंबज्ञ ह्याचेची नाम । अंबज्ञ आपुले काम ।
अंबज्ञ ह्याचेची धाम । अंबज्ञी आम्हा आराम ॥४॥

कृतज्ञ अंबेच्या चरणी । सादर बापूच्या प्रेमी ।
हीच होय अंबज्ञता । दादा जाहला सांगता ॥५॥

नाथसंविध् दाखविले । भयाला मरणची आले ।
ही इच्छा त्रिनाथांची । बदलवी वळणे जीवनाची ॥६॥

संकटी तरण्या बळ देई । प्रगतीच्या वाटेने नेई ।
नाथसंविध् अनिरुद्ध । म्हणूनची सर्वांशी बंध ॥७॥

पिसाचा नाथ अनिरुद्ध । पिसाची संवित्ती अनिरुद्ध ।
धरिता संगत अनिरुद्ध । सकलची नाथसंविध् ॥