Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ovalu Ge Maay Aniruddha from album Ovalu Aarti

Lyrics of Ovalu Ge Maay Aniruddha from album Ovalu Aarti
११. ओवाळू गे माये अनिरुद्ध

ओवाळू गे माये अनिरुद्ध, सबाह्य प्रेमळा सबाह्य प्रेमळा।
भक्तांसाठी सुख शांती देण्या हा उभा ।।ध्रृ।।
चक्रधराचे चक्र फिरतसे, सदैव लीलेने सदैव लीलेने।
प्रारब्धाचा चेंदामेंदा सहज करु जाणे ।।१।।
सावळा सुंदर जैसा लावण्याचा गाभा
जैसा लावण्याचा गाभा ।
वामांगी ती नंदामाता कारुण्याची आभा ।।२।।
ईष्टरुप दावूनी सकळा स्वरुपी स्थापिसी
सकळा स्वरुपी स्थापिसी ।
कधी ध्वजांकुश, शंख पद्मा चरणी दावीसी ।।३।।
स्मित अधर, विशाल नयन, उटी तनूसी चंदनाची
उटी तनूसी चंदनाची।
नासिक सरळ, भाली कस्तुरी साजे गौरवाची ।।४।।
सुनयन कमळे ध्याता तुझी, तुटती बंधने
तुटती बंधने ।
एक मागतो देवा जवळी घ्यावे प्रेमाने ।।५।।