Lyrics of Ovalu Aarti Majhya Sawalya Raja from album Ovalu Aarti

१२. ओवाळू आरती माझ्या सावळ्या राजा
ओवाळू आरती माझ्या सावळ्या राजा ।
ओवाळू तुज देहदीपे, अनिरुद्धा सघना ।।ध्रृ।।
षङ्रिपूदमना, दानवहनना, भवसंकटहरणा।
दिनकर अघभयहारक तारक, भक्तकाजवरणा ।।१।।
अकारण कारुण्याची छाया तूची धरिसी देवा ।
तुझीच व्हावी भावे सेवा, दे अगणित गुण ठेवा ।।२।।
फळले भाग्य माझे, धन्य झालो संसारी ।
भेटला अनिरुद्ध, तेणे धरियेले करी ।।३।।
ओवाळू आरती माझ्या सावळ्या राजा ।
ओवाळू तुज देहदीपे, अनिरुद्धा सघना ।।ध्रृ।।
षङ्रिपूदमना, दानवहनना, भवसंकटहरणा।
दिनकर अघभयहारक तारक, भक्तकाजवरणा ।।१।।
अकारण कारुण्याची छाया तूची धरिसी देवा ।
तुझीच व्हावी भावे सेवा, दे अगणित गुण ठेवा ।।२।।
फळले भाग्य माझे, धन्य झालो संसारी ।
भेटला अनिरुद्ध, तेणे धरियेले करी ।।३।।