Lyrics of Ovalu Aarti Nande Aniruddha Priye from album Ovalu Aarti

९. ओवाळू आरती नंदे अनिरुद्धप्रिये
ओवाळू आरती नंदे अनिरुद्धप्रिये
नंदे अनिरुद्धप्रिये ।
पतिप्रेमाची मूळ रागिणी, अविरत सुख वरदे ।।ध्रृ।।
अनिरुद्धाची शक्ति नंदा अवतरली जगती
नंदा अवतरली जगती ।
मनबुद्धिचे दीप लावूनी ओवाळू आरती ।।१।।
ओवाळिता मन माझे ठाकले ठायी
मन ठाकले ठायी ।
कोटी तारकांची शोभा तुझिया पायी।।२।।
शुभाशुभ दोन्ही नमिती कर जोडोनी
नमिती कर जोडोनी
प्रारब्धाच्या विशाल भिंती, तूची तोडिसी ।।३।।
हरि माझा गे भोळाभाळा, तुझा आज्ञांकित
हरि तुझा आज्ञांकित ।
आल्हादिनी तू राधा रखमा, वामांगी सुंदर ।।४।।
तुझिया छायेत आम्हा कमी काही नाही
आम्हा कमी काही नाही ।
सरले कष्ट अमुचे, सुखी झालो संसारी ।।५।।