Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Omkar Vyapka Aniruddha from album Pipasa Pasarali

Lyrics of Omkar Vyapka Aniruddha from album Pipasa Pasarali

ॐकार-व्यापका अनिरुध्दनाथा



ॐकार-व्यापका अनिरुध्दनाथा । देवा गणनाथा आदिबीजा ॥ धृ ॥

आद्य तुझे नाम गणांच्या नायका । वैष्णवनायका गणाधीशा ॥
अज्ञानाचा हर्ता गुरुचि गणेश । तूच स्वानंदेश अनिरुध्दा ॥ १ ॥

लेखक व्यासाचा पुत्र पार्वतीचा । आत्मा तो शिवाचा हेरंब बापू ॥
प्रसन्न त्वरित होतोस स्मरणे । तुझिया दर्शने इष्टसिध्दी ॥ २ ॥

बापु गजानना आलो तुज शरण । पाहता चरण झालो धन्य ॥
आहार विहार आचार विचार । राहो निरंतर शुध्द माझे ॥ ३ ॥

बापु विनायका देई वर हाचि । होऊनि तुझाचि राहो आता ॥
योगीन्द्र म्हणतो नको मज ज्ञान । गुणांचे कीर्तन व्हावे तुझ्या ॥ ४ ॥