Lyrics of Nitant Madhura from album Pipasa 4

नितांत मधुरा
नितांत मधुरा ह्याची वाणी कधीही न जाई वाया।
आमुचा एकचि जीवनत्राता॥
शब्द तुझे जरी दुरून ऐकले।
नशीब आमुचे तरी फळफळले।
भिऊ कशाला मागू कुणाला।
तारक हा आम्हां॥
रूप तुझे मग भरून पाहता।
चित्त विसावे धरी शांतता।
तूचि साध्य अन् तूच सिद्धता।
तारक हा आम्हां॥
स्पर्श तुझा रे डोईवरचा।
नकळत होई जन्म सुखाचा।
स्वामी मनाचा, प्रभू कर्मांचा।
तारक हा आम्हां॥
शब्द, रूप अन् तव स्पर्शाचा।
अगाध महिमा अनुभवण्याचा।
कमलातील मकरंद चवीचा।
तारक हा आम्हां॥
तर्क कुतर्का दूर सारा।
पहा ह्याचा भव्य पसारा।
पिपा जाणतो हाच निवारा।
तारक हा आम्हां॥