Lyrics of Nilya Nilya Abhalala from album Pipasa Pasarali

निळ्या निळ्या आभाळाला
निळ्या निळ्या आभाळाला झुला झुलतो विजेचा
झुल्यावरी झुलतो माझा अनिरुद्ध सावळा गं अनिरुद्ध सावळा ॥ धृ ॥
वामांगी बैसलीसी नंदामाई कोमलांगी
माऊली विश्वाची योगमाया मायावती ॥ १ ॥
मिटलेले डोळे त्याचे ओठी बासरीची धुन
सांडताना सूर सावरत नंदाईला ॥ २ ॥
झोका जाई उंच उंच, उंच आकाशाच्या वर
सोनसळी शेला त्याचा सांडतो क्षितिजावर ॥ ३ ॥
झुलझुलता झोक्यात राधा जाहली सावळी
मोरपिसावर आली सोनकळा केशराची ॥ ४ ॥
कैसा खेळ देवा तुझा डोल डोलवी ब्रह्मांडा
साधी म्हणे मायबापा चरणांसी ठेवी नाथा ॥ ५ ॥