Lyrics of Nijarupala Davi Deva from album Gajtiya Dhol

11. निजरुपाला दावी देवा
निजरुपाला दावी देवा, विसाव्याची हो यावी घडी ।
भक्तीबाण तो उरात रुतला, अनिरुद्धा तुम्ही या हो झडी,
जी जी रं जी ॥धृ॥
पाण्याचा रे रंग कोठला, जैसा मिळवा तैसा रे ।
तुझ्या रुपाचे चित्र कोठले जैसी रेखा ओढू रे,
जी जी जी जी ॥१॥
ग्रहण सुटले चंद्राला ना, सूर्याला या त्रिभुवनी ।
भक्त तुझाची अखंड राहे, रंग रंगता तव भजनी,
जी जी रं जी ॥२॥
मस्तकी हस्तक ठेवूनी देती, भाक हजारो सोंगाडी ।
वारा फिरता पाठ फिरवती, करती मग हाडाहाडी,
जी जी रं जी ॥३॥
सर्व ठिकाणी तोंड फोडुनी, आलो मी तुझिया दारा ।
केवळ नजरे बांध घातले, दुर्दैवाच्या भरतीला,
जी जी जी जी ॥४॥
जप कोणता, तप ते कैसे, भजन ना वळते वाणीला ।
केवळ तुझेच नाम रगडता, थरथर सुटली पापाला,
जी जी रं जी ॥५॥
सखे सोबती धन संपत्ती, ना आली रे कामाला ।
तूच पावता समर्थ झालो घट्ट धरी या पाप्याला,
जी जी रं जी ॥६॥