Lyrics of Naraliche Jhadakhali from album Pipasa 1

१५. नारळीचे झाडाखाली
नारळीचे झाडाखाली ।
बैसता निवांत।
टपकून फोडे डोई।
हे न ओळखीत ॥
कल्पवृक्ष देई सारे।
परि नेदी छाया।
ऐसी जाण उणी माया।
नसे ह्याच्या पाया॥
पिपा म्हणे सोडा कल्प।
सोडा कल्पवृक्ष।
एक नाम अनिरुध्द।
होई सर्व सिध्द॥