Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Nahu Tujhiya Preme from album Pipasa 2

Lyrics of Nahu Tujhiya Preme from album Pipasa 2

नाहू तुझिया प्रेमे



नाहू तुझिया प्रेमे अनिरुध्दा प्रेमसागरा
माझ्या भक्तनायका।
थेंब एक हा पुरा, अवघे नाहण्या ॥

ओलेचिंब मन हे झाले अंग अंग शहारले।
कातड्यातूनी आतुडी, शिरले प्रेम सावळे ॥

चरणधूळ हाचि साबण, नामस्मरणाचे उट्टण।
अंगमर्दन तुझिया लाथे, भरून पावले ॥

लाट फोडते खडकाला, ऐसे आम्ही ऐकियेले।
पिपा फुटला या थेंबे, प्रेम आंधळे ॥